वेदांमध्ये विश्वाच्या निर्मितीबद्दल काही सिद्धांत आहेत. या काल्पनिक कथा नसून हे अतिशय वैज्ञानिक सिद्धांत आहेत. आधुनिक विज्ञानाने मांडलेले सिद्धांत हजारो वर्षांपूर्वी वेदांमध्ये नमूद केलेल्या सिद्धांतांशी जुळतात.
आधुनिक विज्ञान कोणताही सिद्धांत पुराव्याच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, परंतू अनेक सिद्धांतांमध्ये काही मूळ कल्पना गृहीत धरलेल्या असतात. वैदिक साहित्य पुराव्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आत्मज्ञानावर लक्ष केंद्रित करते.
पुरुष सूक्त हा असाच एक सिद्धांत आहे जो विश्वाच्या निर्मितीचे वर्णन करतो. बिग बँग थिअरी मध्ये पुरूष सुक्तामध्ये नमूद केलेल्या संकल्पना आहेत.
या पुस्तकात लेखक पुरुष सुक्ताचे विश्लेषण आणि व्याख्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून देत आहेत. पुरूषसूक्तातील विज्ञान आणि उपलब्ध ज्ञान उलगडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. पुरुष सूक्त विश्वाची निर्मिती किंवा प्रकटीकरण यावर चर्चा करण्यासाठी स्वीकारले जाते. या पुस्तकात दिलेले पुरुष सूक्ताचे विश्लेषण आणि व्याख्या निर्मिती किंवा प्रकटीकरण या विषयावर केंद्रित आहेत.
Reviews
There are no reviews yet.